13.12.13

तारूण्याच्या स्वर्गात

स्तब्ध हे आकाश तारे
स्त
ब्ध हे आसमंत सारे
स्त
ब्ध ह्या चारी दिशा
निशब्द भावना सा-र्या … 
काळ ही स्तब्द झाला आता 
संपली … भंगली, टाकली
ती अल्लड …. अवखळ….
निर्वाज्य….निर्मळता…. 
………. 
हळुवार ….मंद…. धुंद
तुझा 'तो' स्पर्श …अन रोमांच जन्मले
कुठले हे मनोविश्व, 
मना तू ….
त्याच शरीराचे नवरूप अनुभविले….
रक्तात सुनामीचे हे काहूर कोठून माजले
क्षणात विसरले ह्या जगा, सोडली लज्जा
अन तारूण्याच्या स्वर्गात अवतरले….
मलाही न कळले ….कधी…. कशी मी
बाहूपाशात प्रियतमाच्या….  अलगद विसावले.

Un- Natural Gay?                             
              Un- Natural Gay? 

They say, we are un-natural have deformity
Deny us dignity, right to live and natural gaiety
“You are unnatural” ….against the Majority
Alas! It’s our fate…. though born naturally….

Lucky are blind, deaf and dumb though in minority
Blessed are those lame, lacking natural ability
Carrying deformity which has public visibility….
Fortunate are they, mentally unsound
Though “different”, but, Law does not hound…

They say, I am Gay, “diseased, sick mentally “
Unnatural they call, though I feel naturally….
How infertility in some Male is natural, justified logically?
Hiring surrogate mother is now natural legally?
After Marriage, Live-in Relationship, is approved silently?
Oh! Now we are against religion…have disorder psychological
They bully us, when we tell them, about names mythological.

Trust me; it’s not in our deformity,
It’s in our demand for co-living and sexual liberty
Peaceful we ask and are handled brutally
Introspect “You powerful …natural Male” honestly
Behind curtains, how your SEX is performed oppressively….  

It’s in the right to Sex we demand….
Challenging egoistic, self-declared
Brutal, unnatural right of “Male Manliness”
Which, even frowns, at modern female dress?

Gays are special, Natural, not criminal bad
Unfortunately born in wrong, the most Hippocratic land. 

8.8.13

                        Wise Spirits

Luckiest is the Man on earth , whom even angels envy
In whose company, a woman reveals her heart honestly
Whoever are they, though not socially savvy
Holiest is that relation, though looked down 'legally'....

He is the perfect Man, rest are oxes and foxes
Posses her under title of social boxes
Need ....be-getting some pseudo relation
All is well,  in the name of culture and tradition....

He is the true Man, who tasted devotion nectaral
An enchanting touch, of rainbows emotional
Bestowed with dreadful....delicate experience petals
To enter into magnificently mysterious, female heart sentimental....

It is the true relation, the complete Man's life on earth
Envied  even by the emperors and enriched, aspiring rebirth
Its the highest peak, climax in relationship, thrilling than birth
Far subtle, everlasting, too above than animally physical dirt.


16.2.13

प्रेम कधी मिळते का विनंतीने?


असे न घडले कधी, संकटा आधी न सावरले 
आज अनपेक्षित परीस्थितीत मन कधी न ते बावरले ....
संकट समयी न 'उचलता', का असे "परमपित्याने" वागवले
मनाला कितीही विचारता, ते शांत चित्ताने पडले ....
ठरविलेच आज, ह्याचे उत्तर शोधायचे ...
शांत चित्ताने मग अंतर मनात डोकावले
'त्या' शांत, निशब्द क्षणी ते पुटपुटले 
"विसरलास?....परमपित्याचे शब्द....
तू आता शांत राहायचे....तुझे सांगणे 
भावना व्यक्त करणे...थांबवायचे.
विसरू नकोस, प्रेम मिळत नसते विनंतीने ....
ते का कधी असते सहानुभूती मध्ये ?
मदत करून मिळते आस्था ...नसते ते प्रेम....
भावनिक दृष्ट्या तिला सांभाळता 
आदरयुक्त भावनो उत्कटता का असे प्रेम ?
प्रेम ...कारणाविना हि जे फुले 
दुष्काळातही राहे हिरवे 
कुठलेही 'देणे' नसे तिथे 
नैसर्गिक उन्मनी अवस्था ती 
हाता पाया पडून का 'जन्म' घेत असे?
लाचारी ... स्वार्थच तो ...अध:पतन ही मानवाचे  
कसे रे तुझे धैर्य भक्ता 
माझ्या पायाशी मदत मागण्या येण्याचे ?"
घेवू दे 'तिला' पाऊल पुढे...
असेल अंकुर तर, उगवेल वटवृक्ष प्रेमाचा 
नसेलच प्रेम बीज तरीही अपेक्षिणे 
हा मूर्खपणाच नव्हे काय माझ्या प्रिय  भक्ताचा?
न प्रेमांकुर तिच्या मनामध्ये जन्मता 
'होकारा' साठी आटापिटा 
दोष ....व्यभिचारच तो तुझा...
होकारही मग तिचा ...
आयुष्य भराच्या  दु:ख कारणाचा.
माझा भक्त तोच जो नकारही घेई सन्मानाने 
माघार घेवूनही मन जिंके, समोरील मानवाचे 
मग 'मी' काळजी घेई आज्ञा ओळखणा-र्या "भक्तांची"
बाकी सगळी जगातील रिकामी मडकी 
उगेच 'माझ्या' नावे मिरविती 
मडकीच ती मग एक दिवस 
मातीमध्ये मिसळती......

20.1.13

जीवन नौकेचा विनाश....


                                           जीवन नौकेचा विनाश....


सखी, तुझा नकार आरपार छेद करून घुसलाय 
जणू जीवन रुपी नौकेने अथांग मनरूपी सागरात 
अनंतकाळ थांबण्याकरिता, खोलवर नांगर टाकलाय.....

थांबली आहे जीवन नौका एकाच उध्वस्थ बंदरावर 
जिथे कधी कधी आता महत्वाकांक्षेचे वारे वाहतात 
अन तो व्हृदयद्रावक नकार आठवताच 
कोमेजल्या फुलासारखे, तेच मान टाकून थांबतात.... 

हास्यही अधून मधून भेट देते ह्या जीवन नौकेवर 
पण तो नकार आठवताच ...
तेही फिरते निराशेच्या सीमा रेषेवर 
अपयशाच्या सुनामीला माझ्या जीवन नौकेने कवटाळले   
'यश' नावाचे सुंदर बंदरही आता, वाटते नकोशे 

जग नावाच्या बंदरातूनच, जीवन नौकांचा प्रवास  
पण ह्याच बंदरावर माझ्या जीवन नौकेला  
कवटाळावा वाटतो विनाश....   
कारण तिलाही आता बघवत नाही 
सुंदर विचार रुपी रंगीबेरंगी माश्यांचे 
नकाराच्या नांगराखाली चिरडणे  
मनरूपी सागरातील ज्वालामुखी मध्ये 
त्यांनी तडफडून मरणे...

22.12.12

काय ही अवस्था...भगवंता !!!!


काय ही अवस्था...भगवंता !!!!
काय ही अवस्था...
वेगळेच अनुभवतोय 
जे न बघितले ह्या मनो-डोळा 
सतत मनामध्ये तूच
अवती भोवतीही दिसतो तूच...
ध्यास तुझा, विचार ही तूच.

जरा इकडे तिकडे 
क्षुधा शांती करिता  
कुठेही, कधीही, कसेही, 
काहीही करीत असो, पटकन 
विचारांमध्ये डोकावतो तूच.  

दिसता तू मनच विचारे 
का रे तू इथे, हे तर तुज विटाळे ?
पण तरीही तुझे न जाने 
माझ्या मना आजवर न कळे.
दारू पितांनाही दिसे तूच 
सिगरेट पितांनाही जानवे तूच 
शय्येवर सहचारिणी सोबत
तरीही विचारांन मध्ये असे तूच.

तू दिसता येई प्रेमाचे भरते 
डोळ्यांमध्ये कृतग्घ्नतेचे आसू 
तुज धन्यवादे मनाची उत्तम बाजू 
तुझेच अस्तिव दृष्टीत, वाईटही बाजू....

तुलाच वाहे शिव्यांची लाखोली, परंतु 
मन तुजविना जणू मासा बिन पाणी      
कसे हे अदभूत, विरोधी भावनांमध्येही 
दिसे तूच....चांगल्या आणि वाईटातही 
माझ्या सर्व बाजू व्यापल्या तूच. 

तुझाच विचार सदा मनामध्ये 
प्रेम हि तूच...द्वेष हि तूच, राग हि तूच 
आनंद अन स्वानंद हि तूच...
भाव..आव.. आस्था...अनास्था  
व्यभिचार अन विकृती 
वासना...आकार ...विकार  
ह्या माझ्या मनोवस्थे मध्ये
सतत उभा दिसे तूच.

नवलाई बापा तुझी, ह्या द्वंद्वामध्येही 
द्वंद्व न वाटे, जगाने ठरविलेल्या
विकृती व्यभिचारामध्येही  
कुणाचे मन न तुटे...
ह्या सर्व विविध छटांमध्येही 
प्रत्येका प्रती प्रेम...आदरच उमटे
जरी जीवनवाटे मध्ये जनमान्य
स्वार्थ अन द्वेष भेटे... 


काय हि अवस्था...व्यक्त झाली जीवावाटे.
माझे मलाच आज नवल वाटे...
जग म्हणे मी मनोरुग्ण 
हवा वैद्याचा सल्ला मला 
काय सांगू ह्या जगाला 
मार्ग हा तुझा न्यारा.

17.12.12

प्रिये, तू आज सोडच मला....

           
जा ...आज तू जाच, माझ्या आयुष्यातून तुझे जाणेच
जणू हिमालयातील थंड हवेचे आयुष्यात आगमन होणे...
रूढी, परंपरा, चालीरीती अन धर्माच्या नावाखाली
लपवतेस समाजावरील अवलंबित्वाला, म्हणतेस,
जग काय म्हणेल अशी वागले तर एका स्त्रीला...

अनुकरणाच्या तप्त ज्वालामुखी सोबत घातलास तू जीवनाचा घाट
फुटेलच तो कधीतरी, तरीही तुझ्यातच गुंतणे,
म्हणजे माझ्या नैसर्गिक जगणा-र्या  मनाची पुरती वाट ...
निरागस बालक मी, शोधतोय हळव्या मनाची साथ
अनंत जीवदशा भटकलो, मिळण्या मनुष्य जन्माचा साज...

सर्व खटाटोप होता जागविण्या तुझ्या मनो-निसर्ग रूपा,
सत्याचे लोंढे वहावले मी, वाटले कधीतरी फोडेल
तुझ्या बंदिस्त विचारांच्या धरणांना,
योग्य काळजी न घेता, एकाच ठिकाणी, पाणीही नासे,
कसे न कळे, तुझ्या मनाला ?

पतिव्रता ...आजची सावित्री तू , अशीच घुटमळत, आबादित ठेव
जगानेच ठरवलेल्या तुझ्या पावित्र्याला,
भाकड कथा त्या ढोंगी समाजाच्या
जखडून ठेवण्या, उपभोगण्या, 'बांधलेल्या' स्त्रीला
उभ्या आयुष्यात सत्यवान नाही बघितला
पत्नीला परत आणण्या, जो सरळ भिडला यमाला.

हतबल पुरुष , जो न जिंकू शके स्त्री मनाला
समजणे तर दूर, ओळखू ही न शके तिला
सांगत सुटे मग हजारो गोष्टी स्त्री धर्माच्या
जणू पत्नी म्हणजे गाय म्हैस, टिळा लावला
की आयुष्य भर दुध दुभत द्यायला....

लख लाभ तुला हे ढोंगी जीने, जीव गुदमरे माझा
प्रिये, समाज मन सांभाळण्या, जगणे ही न कळले तुला
समजू शकतो मी तुझे ममत्व निरागस बाळाप्रती
स्व-इच्छांची होळी करावी, घुटमळत जगावे
हीच का तुझी शिकवण पोटच्या गोळ्यालाही?

भीती वाटे मजला त्या दिवसाची जेंव्हा, फुटेल ह्या भ्रमाचा भोपळा
अंधकारमय जीवनच नशिबाला, अंध अनुकरणामय त्यागाला
संपलेला असेल मग ह्या जन्मीचा जीवन सोहळा,
उध्वस्थ जगणे अंतकाळी नाही आनंद कुणाला....

मी मदमस्त हत्ती,  जीवन लाटांवर स्वार होऊनी नियंत्रे दर्याला
परमेश्वराचा सरळ आशीर्वाद, लाथाडण्या ढोंगी जगण्याला
"त्यानीच" सांगितले मज, विधिनिषेध नसावा शरीराचा
स्त्री अन पुरुष, शरीरे सगळी एकच, का आसक्त एकाला?
तू जीव फक्त भावनेचा तहानलेला, ह्याच तळ्याचे पाणी हवे
हा विचार करून, तहानलेला मरण्यास, होऊ नको दुधखुळा.

प्रिये, जे स्वातंत्र माझ्या जीवा...तेच तुझ्या जीवा
आज मी अनुभवे जी नैसर्गिक उन्मनी
परमेश्वर चरणी एकच प्रार्थना
क्षणिक का होईना
लाभू दे, तुज मनी.